नवी दिल्ली : जग घूमया, दिल दिया गल्ला आणि चासनी सारख्या गाण्यांची गायिका नेहा भसीन ( Neha Bhasin) ने आपले अनेकदा लैंगिक शोषण झाल्याचे म्हटलंय. एका मुलाखतीत ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली. १० वर्षांची असताना एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचे ती म्हणाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी मी दहा वर्षांची होते. देशातील धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या हरीदवारमध्ये माझी आई माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. अचानक एक व्यक्ती आली आणि मला मागच्या बाजुने चुकीच्या पद्धतीने बोट लावू लागली. मी घाबरुन दूर पळून गेले असा प्रसंग नेहाने मुलाखती दरम्यान सांगितला. 



काही वर्षानंतर एका व्यक्तीने हॉलमध्ये माझ्या छातीवर चुकीच्या पद्धतीने हात लावला. मला हा घटनाक्रम स्पष्ट आठवतोय. मला वाटायचं की माझी चूक आहे. आता लोक सोशल मीडियावर येतात आणि इतरांचे मानसिक, शारिरीक, भावनात्मक आणि धार्मिक रुपात शोषण करतात. हा विना चेहऱ्याचा दहशतवाद असल्याचे ती पुढे म्हणाली. 



यावेळी तिने सायबर बुलिंगचा अनुभव देखील शेअर केलाय. मी एकदा इतर गायकाच्या दृष्टीकोनाचे समर्थन केले होते. मी पॉप बॅंडबद्दल काही म्हटलं नव्हतं. या बॅंडची चाहती नाहीय असं केवळ विधान केलं होतं. त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. पॉप बॅंडच्या चाहत्याने बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नेहा म्हणाली. मी आता शांत राहत नाही. पोलिसात तक्रार करते असे देखील ती पुढे म्हणाली. 


सायबर बुलिंगविरोधात वक्तव्य 
अशा प्रकारच्या घटनांमुळे मला 'कंहदे रहंदे' बनवण्याची प्रेरणा मिळाली. जे सायबर बुलिंगच्या विरोधात आहे. शेमिंग, सेक्सिजम, सायबर बुलिंग आणि महिलांप्रती रुढीवादाविरोधात हा ट्रॅक आहे. कोणतीही चुकीची गोष्ट सहन केली जाऊ नये. चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवला पाहीजे असेही ती म्हणाली.