मनोरंजन विश्वातील बरेचसे कलाकार हे सामाजिक कार्यात सक्रीय असतात. कोविडमध्येही मराठी, बॉलिवूड आणि साउथमधील सर्वच कलाकारांनी आपआपल्या परीने जमेल तसं लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. कधी कॅमेरामागून तर कधी इतरांना सोशल मीडियावर आवाहन करत अनेक सेलिब्रिटी समाज कल्याणाचं काम करतात. असंच एक बॉलिवूडमधील नाव सध्या चर्चेत येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीररातील रक्तशुद्धीकरणाचं काम हे हृदय करत असतं, त्यामुळे हृदयाचं आरोग्य महत्वाचं असतं. मात्र काही मुलांना जन्मत: हृदयाच्या आजाराचा असतो. अशा मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या पालकांना परवडत नाही. त्यामुळे या मुलांच्या उपचारासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका 'पलक मुंच्छल' कायम मदतीसाठी पुढे असते. पलकने 3000 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांचा खर्च केला आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर नेटकरी आणि दिग्गज कलाकारांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला.पलकने 3000 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अजूनही काही मुलांची शस्त्रक्रिया बाकी असून लवकच तेही त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं आयुष्य जगतील असा मला विश्वास आहे. पलकच्या या पोस्टने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. 


 



पलक तिच्या गोड आवाजामुळे लोकप्रिय आहे तितकच तिचं समाजकार्य देखील मोठं आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून पलक समाज कार्यात सक्रिय आहे. आपण ज्या देशात, ज्या समाजात राहतो, त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. एकमेकांना मदतीचा हात पुढे केला तरचं आपल्या देशाची प्रगती होईल,हाच आशय घेऊन तिने अनेक लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला. तिच्या या सामाजिक कार्याची दखल 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये घेण्यात आली. पलक म्हणते की, संगीत हे माझ्या सामाजिक कार्याचा देखील भाग आहे. 


लाईव्ह कॉन्सर्टमधून मिळणाऱ्या मानधनातला काही भाग मला या मुलांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. तसंच कॉन्सर्टमधील दिग्गज मंडळींकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते. पलक पुढे असंही म्हणते की, या समाजात काही संवेदनशील माणसं आहेत ज्यांना आपल्या समाजाचं आणि देशाचं हित महत्त्वाचं वाटतं.त्यामुळे अशी अनेक माणसं माझ्याशी जोडली गेली. तिच्या या सामाज कार्यावर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.