प्रख्यात गायकाचं 55व्या वर्षी निधन
बंगाली सिनेमाचे प्रख्यात गायक प्रतीक चौधरी यांनी वयाच्या 55 व्या वर्षी आखेरचा श्वास घेतला.
मुंबई : बंगाली सिनेमाचे प्रख्यात गायक प्रतीक चौधरी यांनी वयाच्या 55 व्या वर्षी आखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी त्यांच्या कुटुंबाने दिली. त्यांच्या अचानक जाण्याने बंगाली सिनेमात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे. बंगाली संगीत क्षेत्रात प्रतीक चौधरी यांनी फार मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये आपल्या आवाजने रसीकांची दाद मिळवली होती.
त्यांच्या अचानक जाण्यावर गायिका परोमा बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले, 'त्यांचे अचानक जाणे अविश्वसनीय आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एका कार्यक्रमात भेटलो होतो.' असे वक्तव्य त्यांनी केले
ह्दय विकाराच्या झटक्याने प्रख्यात गायक प्रतीक चौधरी काळाच्या पडद्याआड गेले.