मुंबई : हॉलीवुड स्टार सिंगर रिहाना (Rihanna) आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच आई- बाबा होणार आहेत. रिहाना गरोदर असल्या क्षणापासून तिनं सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केल्याचं आपण पाहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही सेलिब्रिटी गरोदरपणातही स्टाईल स्टेटमेंट द्यायला विसरत नाहीये. तिच्या फोटोंवर समाजातील काही वर्षातील लोक मात्र टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. 



पण, कशाचीही तमा न बाळगता, न्यूनगंडांना शह देत रिहाना अनेकांची मनं जिंकताना दिसत आहे. हल्लीच तिनं एका मासिकासाठी फोटोशूट केलं. पायघोळ गाऊन असो किंवा मग एखादा टॉपलेस फोटो, रिहाना कुठंच मागे आलेली दिसली नाही. 



रारिहाला मुद्दा ट्रोलिंग आणि टिकेचा तर, हा ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनाचा आणि स्वातंत्र्याबाबतचा निर्णय. 



दरम्यान रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी या दोघांनीही 2021 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. 2016 मध्ये रिहाना अखेरची एका अल्बममधून झळकली होती. 




तिचा एकंदर अंदाज आणि लूक पाहता येणाऱ्या काळात प्रसूतीनंतर तिचे फॅशन गोल्स कसे असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.