मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर अनेक गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत की विचारुन सोय नाही. विविध माध्यांमांच्या उपलब्धतेमुळे जगही जवळ आलं आहे. या सोशल मीडियाचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला असेल, तर तो म्हणजे कलाकार वर्गाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध कला अंगी असणाऱ्या असंख्य कलाकारांनी त्यांचं कौशल्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. यात प्रसिद्ध चेहरेही मागे राहिलेले नाहीत.


लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन नुकताच पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे.



बंगळुरूतील एका हॉटेलमधील व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी तेथील हॉटेल स्टाफचं गायन कौशल्य सर्वांसमोर आणलं आहे.


कॉनार्ड हॉटेलमधून बाहेर पडतेवेळीच त्यांनी या दोन कलाकारांना आपल्या इन्स्टा अकाऊंटच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे.



डोयाल आणि अश्विनी अशी त्या दोनही कलाकारांची नावं असून, त्यांनी गायलेली गाणी पाहता खरंच त्यांची दाद द्यावी तितकी कमीच आहे, असंच तुम्हीही म्हणाल.


महादेवन यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यांचीही दाद दिली आहे. कारण, त्यांच्याच माध्यमातून या दोन्ही गायकांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली.