मुंबई : कला हे एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याती संधी मिळते, तर कोणा एका व्यक्तीला याच कलेच्या माध्यमातून नवी अशी ओळख मिळवता येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये याचाच प्रत्यय पाहायला मिळत आहे. 


सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी एका अशा कलाकाराला सर्वांच्या भेटीला आणलं आहे, ज्याच्या गायनाने सर्वच मंत्रमुग्ध होतील. 


विंग कमांडर कृष्णकुमार असं  त्या अधिकाऱ्याचं नाव असून, त्यांची गायन शैली पाहता कोणा एका पार्श्वगायकाप्रमाणेच ते अतिशय सुरेखपणे गात आहेत. 


'कलेने समृद्ध असणाऱ्या अशा या प्रतिभावान कलाकाराला भेटून मला फारच आनंद होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांशी जोडलं जाण्याची, त्यांची भेट घेण्याची संधी मला मिळतेय हे माझं भाग्यच आहे', असं महादेवन यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 



त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये सैन्यदल अधिकारी कृष्णकुमार हे येसुदास यांच्या गाण्याचे सुर आळवताना दिसत असून, त्यांची स्वरसाधना खरंच अनेकांच्या मनाचा ठाव घेतेय, असं म्हणणं वावगं ठरणार  नाही.