attacked on Sonu Nigam Video Viral : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  स्टेजवरच  सोनू निगम याला धक्काबुक्की करण्यात आली.  मुंबईतील चेंबूर परिसरात एका  ईव्हेंटमध्ये हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोनू निगमच्या कार्यक्रमात गोंधळ घालत त्याच्यावर हल्ला करणारे कोण आहेत याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंबूरमध्ये लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. चेंबूर महोत्सवाचा सोमवारी शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये सोनू निगमला आमंत्रित करण्यात आले होते. सोनू निगम परफॉर्म करून परत जात असताना काही लोक सेल्फी काढू लागले, तेव्हा सोनू निगमच्या टीममधील एक व्यक्ती खाली पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोनूची प्रकृती ठीक आहे.


या हल्ल्यात सोनूच्या शिक्षकाचा मुलगा रब्बानी खान जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.