मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायक सोनू निगम चांगलाचं चर्चेत आहे.  दरम्यान 'भारतात मुलाला गायक बनवण्याची इच्छा नाही..' या वक्तव्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. त्यावर सोनूने संताप व्यक्त केला. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने टीका करणाऱ्यांना सुनावले आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की, सकाळी उठून एक लेख वाचला ज्यामध्ये सोनू निगम या देशात त्याच्या मुलाला गायक बनवू इच्छित नाही असं लिहिलं आहे. यावर ट्रोलर्सने अनेक कमेंट देखील केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये सोनूने काही माध्यमांची नावे घेवून अपशब्द देखील वापरले आहेत. सोबतच असं देखील म्हणाला आहे की, 'माझा मुलगा एक गायक आहे टॅलेंटेड आहे. मात्र त्याला जे करायचं आहे त्याची इच्छा ज्यामध्ये आहे, त्या क्षेत्रात तो काम करू शकतो.' असं तो म्हणाला आहे. 



शिवाय, मी एक भारतीय नागरिक आहे, जे तुम्ही कधी नाही समजू नाही असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने त्याचा मुलगा नवीन निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये नवीनने 'कोलावेरी डी' हे गाणं गायलं होतं. 


काय म्हणाला होता सोनू निगम 
 'खरं सांगायचं झालं तर त्याने गायक व्हावं अशी माझी बिलकूल इच्छा नाही आणि झाला तरी या देशात नको.' असं वादग्रस्त वक्तव्य त्याने त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल केलं होतं. शिवाय सोनू म्हणाला की तो आता भारतात राहत नाही. त्याला आधीच दुबईला पाठवण्यात आलं आहे. याक्षणी, माझा मुलगा युएईचा सर्वोच्च गेमर आहे. एक खेळ फोर्टनाइट आहे आणि तो त्याचा टॉप गेमर असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं.