मुंबई :  गायक सुदेश भोसले यांनी थुक्रटवाडीला भेट दिली आणि या वाडीची हवाच बदलून गेली. सुदेश भोसले यांनी यावेळी दादा कोंडके आणि बिग बी यांची मिमिक्री करून दाखवली. तसेच 'गोविंदा रे गोपाळा' हे गाणं गायलं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ढगाला लागली कळं देखील त्यांनी यावेळी ऐकवलं आणि सर्वांनाच पुन्हा दादा कोंडकेंची आठवण झाली. अगदी थोडक्यात सुदेश भोसले यांनी कार्यक्रमात रंगत आणली.