Sunidhi Chauhan : अभिनेता सनी देओलचा सनी देओल 'ये ढाई किलो का हाथ..' हा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. हा डायलॉग ऐकल्यावर सर्वात प्रथम सनी देओल आठवतो. गदर असो की त्रिदेव, ज्यामध्ये सनी देओलने माचो मॅनची भूमिका साकारली आहे. मात्र, एक काळ असा होता की अभिनेता सनी देओल हा त्याच्या सुंदर लूक आणि डोळ्यांनी हजारो मुलींची मने जिंकायचा. सनी देओलच्या पहिल्या चित्रपटाची एक झलक पाहूनच हजारो मुली घायाळ झाल्या होत्या. अशातच एक म्हणजे बॉलिवूड गायिका सुनिधी चौहान. एका कार्यक्रमात सुनिधी चौहानने याचा खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली सुनिधी? 


सुनिधी चौहानचा एक थ्रोबॅक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ rakeshmishra_0  नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सनी देओल, धर्मेंद्र आणि प्रीतमसारखे कलाकार स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओमध्ये सुनिधी चौहान सनी देओलला सांगत आहे की, तुला बघताच माझा तुझ्यावर पहिला क्रश झाला होता. तुझे डोळे आणि प्रोफाईल बघून माझीच नाही तर हजारो मुलींची ह्रदये हरवली आणि आजही तुझ्यावर प्रेम आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे ऐकून सनी देओल लाजू लागला आणि धर्मेंद्र हसायला लागले. सुनिधी चौहानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


सनी देओलचा पहिला चित्रपट


1983 मध्ये प्रदर्शित झालेला सनी देओलचा पहिला चित्रपट हा 'बेताब' होता. यामध्ये अमृता सिंगने त्याच्यासोबत भूमिका साकारली होती. हा चित्रपट 5 ऑगस्ट 1983 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील जब हम जवान होंगे, तुमने दी आवाज ही गाणी आजही खूप चर्चेत आहेत. यामध्ये सनी देओलने हिरोची भूमिका साकारली होती. यानंतर, 1984 मध्ये सनी देओलने 'सोनी महिवाल' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात सनी देओलने नायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर सनी देओलने अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटाने देखील खळबळ उडवून दिली होती.