आणखी एक सेलिब्रिटी हॉस्पीटलमध्ये, `या` आजाराने त्रस्त
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला `सायलेंट किलर`म्हटले जाते.
मुंबई : बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला 'सायलेंट किलर'म्हटले जाते.
उदित हॉस्पीटलमध्ये
अमिताभ बच्चननंतर आता सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आजारी पडले आहेत.
उदित नारायण यांना टाईप २ डायबेटीज हा आजार झालायं.
डायबेटीजमुळे त्यांना युरिन इन्फेक्शनही झालेयं.
तब्येत जास्त खराब झाल्यामुळे त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलयं. सध्या त्यांची तब्येत कशी आहे याबद्दल माहिती मिळाली नाहीए.
अमिताभ सेटवर पडले होते आजारी
तीन दिवसांआधी महानायक अमिताभ बच्च हे 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' च्या सेटवर आजारी पडले.
त्यांच्यासाठी डॉक्टरांचे एक पॅनल मुंबईतून राज्यस्थानला पोहोचले. आता त्यांची तब्येत पूर्णपणे ठिक आहे. यासंदर्भातील ट्वीट त्यांनी नुकतेच केलयं.