Singer Shows Bundles Of Currency Notes In Refrigerator: कलाकारांचं मानधन हा कायमच चर्चेचा विषय असतो. बरं ही चर्चा केवळ भारतातच होते असं नाही तर जगभरामध्ये हा ट्रेण्ड दिसून येतो. सध्या अशीच चर्चा एका गायकाच्या कमाईबद्दल सुरु आहे. या गायकाने एका व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील फ्रीजमध्ये मोठ्याप्रमाणात रोख रक्कम असल्याचं दाखवलं आहे. हा व्हिडीओ सध्या मलेशियामध्येच नाही तर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहून या गायकाच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादालाही तोंड फुटलं आहे. 


कोण आहे हा गायक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरिफ बाहरन असं या तरुण मलेशियन गायकाचं नाव आहे. आरिफने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घरातील फ्रिजमध्ये नोटांचे बंडल दिसून येत आहेत. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात आरिफने एका व्हिडीओमध्ये घरातील ही रोखरक्कम दाखवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या गायकाने घरातील फ्रिजमध्ये नोटा ठेवण्यागील कारण चाहत्यांना समजलेलं नाही. अनेकांनी नोटा ठेवण्यासाठी फ्रिजचा का वापर केला आहे असा प्रश्न व्हिडीओवर कमेंट करुन विचारला आहे. तर काहींनी चोरांपासून पैसे लपवण्यासाठी हा उत्तम मार्ग असल्याचं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याच्या हेतूने आरिफने हा व्हिडीओ पोस्ट केल्याचाही दावा केला जात आहे.


व्हिडीओमध्ये काय दिसतं?


या व्हिडीओमध्ये आरिफ त्याच्या घरातील फ्रिजकडे चालत जाताना दिसतोय. त्यानंतर तो फ्रिज उघडतो तेव्हा त्यामध्ये जेवण आणि इतर पदार्थांऐवजी नोटांचे बंडल असल्याचं दिसतं. या फ्रिजमध्ये 50 आणि 100 चं मुल्य असलेल्या मलेशियन चलनाच्या नोटा आहेत. हा व्हिडीओ टिक-टॉकवरही व्हायरल झाला आहे. अनेकांनी केवळ शो ऑफसाठी हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचं म्हटलं आहे. काहींनी आरिफची बाजू घेताना तो किती यशस्वी आहे हे या व्हिडीओमधून दिसून येत असल्याचं म्हटलंय तर काहींनी प्रभावशाली व्यक्तींनी असे व्हिडीओ शेअर केल्याने त्याचा सर्वासामान्यांवर होणारा परिणाम किती वाईट असतो किंवा त्या सेलिब्रिटीची प्रतिमा कशी डॅमेज होते याबद्दल भाष्य केलं आहे.



मागील 9 वर्षांपासून आहे संगीत क्षेत्रात


युट्यूबवरील अडोलाट्यूब 4854 या चॅनेलवरुन हा मू व्हिडीओ सर्वात आधी शेअर करण्यात आला होता. "आरिफ बाहरन त्याच्या घरातील फ्रिजमधील पैसा दाखवताना," अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. आरिफ हा 2014 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यकरत आहे. 2017 साली प्रदर्शित झालेल्या 'काटा अखिरमु' या गाण्यानंतर तो रातोरात प्रसिद्ध झाला.