मुंबई : प्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुख्य म्हणजे या वादानंतर तिचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. हार्ड कौरने ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्याचप्रमाणे ती या व्हिडिओमध्ये ती खलिस्तानी समर्थकांसोबत झळकली होती. हे सर्वजण खलिस्तान चळवळीविषयी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ शेअर होताच ट्रेंडमध्ये आला खरा. पण, त्यानंतर तिचं अकाऊंट टरवरील अकाऊंट  ट्विटरकडून बंद करण्यात आलं. आपल्यावर ही कारवाई झाल्याचं लक्षात येताच तिने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.  




गेल्या अनेक वर्षापासून काही शीख समूह वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. याच धर्तीवर तिने ही बाब आपल्या अकाऊंटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. ती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हार्ड कौरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप करत, आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या.


हार्ड कौरने अनेक बॉलिवूड चित्रपटातील गाण्यानां आपला आवाज दिला आहे. 'पैसा फेंक', 'पार्टी अभी बाकी' या गाण्यांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्याचप्रमाणे २०११ साली रिलीज झालेल्या ‘पटियाला हाऊस’ या सिनेमातही ती दिसली होती.