मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडचं लव्ह बर्ड्सची सध्या चर्चा आहे. हे कपल सध्या आपले सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियाचा पारा सध्या वाढला आहे. या आधी या कपलने एकमेकांसोबत घालवलेले सुखाचे ते क्षण सोशल मीडीयावरती शेअर केले होते, ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना आणखी उधाण आलं. दरम्यान, त्यांचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने अलीकडेच मलायकासोबत बीचवर सायकलिंग करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर आता या कपलचा स्विमींगपूल मधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हे दोघेही पूलमध्ये सायकल चालवत आहेत.


हा व्हिडीओ मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या फीटनेसचा व्हिडीओ आहे. सुरूवातीला तुम्हाला हे पाण्यात नक्की काय करतायत हे कळणार नाही, परंतु तुम्ही जर नीट पाहिलं तर हे जोडपं सायकलिंग करत आहेत.


यादरम्यान, मलायका पिवळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे, तर अर्जुन कपूर शर्टलेस आहे. हा हॉट आणि फिट व्हिडीओ शेअर करताना अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले - 'जेव्हा गर्लफ्रेंड तुमच्या ट्रेनरपेक्षा कठीण टास्कमास्टर असते!!!'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. मलायका अरोराने यापूर्वी अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खानसोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला 19 वर्षे झाली होती आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.


मलायका अरोरा नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत डान्स रिऍलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून काम करत आहे. यापूर्वी ती मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर यांच्यासोबत सुपर मॉडेल ऑफ द इयर 2 मध्ये जज म्हणून दिसली होती.