मुंबई : 'स्लमडॉग मिलियनेअर'मध्ये सलीम मलिकची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल याच्याविरूद्ध खार पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मधुरवर त्याच्या एक्स गर्लफेंन्डला घरात घुसून जखमी केल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 13 फेब्रुवारीला घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, पीडितेचे वकील निरंजनी शेट्टी यांनी दावा केला आहे की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधूर मित्तल यांची भेट झाली होती. आणि अवघ्या 15 दिवसातच मधुरने मद्याच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,यानंतर 11 फेब्रुवारी रोजी त्याने मधुरशी असलेले सगळे संबंध संपवले. मधुर मित्तलवर खूप चिडला होता.


मधूरने तिच्या खोलीत प्रवेश केला आणि 15 वेळा तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिचे केस खेचले, कान ओढले, तिच्या उजवा डोळ्यावर मुक्का मारत, तिचा मानसिक छळ देखील त्याने केला. असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.



पोलिसांनी मधुर विरोधात छेडछाड, लैंगिक छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. महत्त्वाचे म्हणजे मधुर सध्या जयपूरमध्ये असून वेबसिरीजच्या शुटिंगमध्ये आहे.