`स्लमडॉग मिलिनेयर` फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’
भावी पती कॉरी ट्रानसोबतचे फोटो शेअर करत फ्रिडाने ही गुडन्यूज दिली आहे. फ्रिडा व कॉरी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही.
मुंबई : लव सोनिया व स्लमडॉग मिलिनेयर यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो ( Freida Pinto) हिने चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केलीये. फ्रिडा लवकरच आई होणार आहे.लग्नाआधीच फ्रिडा प्रेग्नेंट असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे.
भावी पती कॉरी ट्रानसोबतचे फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली आहे. या फोटोंमध्ये फ्रिडा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.फ्रिडा व कॉरी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही.
फ्रिडाचा होणारा पती कोरी ट्रॅन हा पेशाने फोटोग्राफर आहे. दीर्घकाळापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. याआधी फ्रिडा देव पटेल आणि रॉनी बकाडीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
फ्रिडाचे ‘स्लमडॉग मिलिनेयर’चा अभिनेता अभिनेता देव पटेल याच्यासोबत अफेयर होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.यानंतर फ्रिडाच्या आयुष्यात पोलो प्लेअर रॉनी बकार्डी याची एन्ट्री झाली.पण हे नातेही फार काळ टिकले नाही.फ्रिडाने ‘स्लमडॉग मिलिनेयर’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर फ्रिडाने तृष्णा, ब्लॅक गोल्ड, नाईट ऑफ कप्स, डेजर्ट डान्सर, लव सोनिया अशा अनेक चित्रपटांत काम केले.