Video Viral : एखाद्या व्यक्तीची कारकिर्द अनेकदा इतकी पुढे येते की मागे वळून पाहताना कधीकाळी आपण नेमके कसे होते आणि काय काम करायचो हे पाहताना जीवनात केलेली प्रगती एका क्षणात डोळ्यापुढे उभी राहते. कैक वर्षांपूर्वी आपलं आयुष्य कलं होतं, हे पाहताना अनेक मंडळी आठवणींमध्ये रमतात आणि याच आठवणींतून काही अविश्वसनीय प्रसंगही बाहेर येतात. असाच एक कमाल प्रसंग सर्वांसमोर आणला होता तो निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरनं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या खास मैत्रिणीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तिची ही खास मैत्रिण कोणी नसून, 26 वर्षांपूर्वी मिस इंडिया ही सौंदर्यस्पर्धा गाजवणारी सौंदर्यवती आहे. तिचं नाव, स्मृती इराणी. धक्का बसला? 


सध्या केंद्रीय मंत्रीमंडळा महिला आणि बालविकास मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या स्मृती इराणी यांनी एकेकाळी छोटा पडदा गाजवला, प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं हे सर्व खरं. पण, त्याहीआधी त्या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये बऱ्याच सक्रीय होत्या. त्याच दिवसांमधील त्यांचा एक व्हिडीओ एकतानं शेअर केला, जिथं चक्क स्मृती इराणींचा 26 वर्षांपूर्वीचा रॅम्पवॉक पाहायला मिळालं.  


1998  मध्ये त्यांनी मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. याचदरम्यानचा व्हिडीओ एकतानं सर्वांसमोर आणला होता जो आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सहसा सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. हा व्हिडीओसुद्धा अगदी तसाच अचानकच चर्चेचा विषय ठरला आहे. स्टायलिस्ट कपडे, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास हे विषेय गुण इराणी यांचा हा व्हिडीओ पाहताना तेव्हाही लक्षात आले आणि आताही लक्षात येत आहेत. 


हेसुद्धा वाचा : उत्तर येईल तोच हुशार! स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूळ नाव काय?



आपल्या या मैत्रिणीनं अतिशय जिद्दीनं यश संपादन केलं आणि आता मात्र राजकारणात तिचं प्रचंड संयमी आणि एकनिष्ठ रुप पाहायला मिळतंय असं एकतानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. मैत्रिणीची एकंदर कारकिर्द पाहता एकता आजही याच मतावर ठाम असेल यात शंका नाही.