नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांचा एक सेल्फी व्हायरल होतोय. स्मृती इराणी आणि सैफ ईशा अंबानीच्या लग्नात भेटले होते. त्यावेळी काढलेला सेल्फी स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोसोबत स्मृती इराणी यांनी मनोरंजविश्वात असताना सैफसोबतच्या काही खास आठवणी सांगितल्या. मी चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईत पहिल्यांदाच आले होते तेव्हा सैफने इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठीच्या काही टिप्स मला दिल्या होत्या. त्या गोष्टी मला आजही स्मरणात असल्याचे इराणी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती इराणी १९९५ साली चित्रपटसृष्टीत नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी सैफ अली खानने नवख्या स्मृती इराणी यांना इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी काही खास टिप्स दिल्या. माझे स्वप्न साकारण्यासाठी या गोष्टींची मला खूपच मदत होते. मी भविष्यात काही तरी करून दाखवेन, याची खात्री सैफला असावी. या आठवणींसाठी मी त्याची नेहमी आभारी राहीन, असे इराणी यांनी ट्विटमधील संदेशात म्हटले आहे.



राजकारणात येण्यापूर्वी 'स्मृती इराणी' या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांची 'क्‍योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका प्रचंड गाजली होती.