Sobhita dhulipala and Naga chaitanya Affair : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र घेण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. आता पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ते दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत हे दाखवण्यासाठी नेटकऱ्यांनी त्या दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. ते दोघेही एकाच ठिकाणी गेले असून त्यांच्या ट्रिपचे फोटो आहेत असे नेटकरी म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या पोस्टमध्ये जी समानता आहे ते पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की ते दोघे एकाच ठिकाणी फिरायला गेले होते. खरंतर, शोभितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जीप सफारीचा एक फोटो शेअर केला होता. तर नागा चैतन्यनं देखील फिरायचे फोटो शेअर केले होते. त्यात तो सूर्यास्तचा आनंद घेताना दिसत आहे. त्या दोघांच्या फोटोमध्ये पाठीमागे जंगल दिसतंय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हे फोटो पाहिल्यानंतर हे दोन्ही फोटो एकाच ठिकाणचे आहेत असं म्हटलं. 


सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सुरुवातीला शोभिता आणि नागाच्या पोस्टमधील समानता पाहून हैराण झाले. खरंतर, शोभितानं गेल्या वर्षी अमेरिकीचा अभिनेता मॅथ्यू मॅक्कनौगीच्या पुस्तकाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांना नागा चैतन्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहिलं तर त्यानं देखील त्याचा पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली होती. 


हेही वाचा : 'महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं...' चिन्मयच्या जवळच्या मित्राची जाहिर विनंती


दरम्यान, 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेस्वे’ च्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. नागा चैतन्यनं 7 ऑक्टोबर 2017 मध्ये समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. तर लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त झाले. त्या दोघांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.