साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच शोभिताने दाखवली इंगेजमेंट रिंग, शेअर केला साडीतला सुंदर फोटो
साउथ सुपरस्टार नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता शोभिता धुलिपाला हिच्या नवीन फोटोंवर चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत. ज्यामध्ये ती इंगेजमेंटची रिंग दाखवत आहे.
Sobhita Dhulipala : शोभिता धुलिपालाचे नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यापासून ती खूपच चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शोभिता धुलिपाला तिची इंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवर नागा चैतन्य याने प्रतिक्रिया दिली आहे.
शोभिताने दाखवली इंगेजमेंटची रिंग
शोभिता धुलिपालाने तिचे साखरपुड्यामधील फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्रीने साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण यावेळी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिच्या बोटातील हिऱ्याची अंगठी. अभिनेत्री या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नागा चैतन्यकडून शोभिताच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव
नागा चैतन्यने त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिबानी अख्तरनेही त्याचे कौतुक केले आहे. त्याबरोबर सर्व चाहते देखील अभिनेत्रीचे कौतुक करत आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या नवीन लुकची जोरदार चर्चा रंगली आहे. तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ऑगस्ट महिन्यात नागा-शोभिता यांचा साखरपुडा
नागा चैतन्य आणि शोभिता यांनी साखरपुडा करण्याआधी दोन वर्षे एकमेंकाना डेट केले होते. आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. दोघे राजस्थानमध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, त्याच्या लग्नाबद्दल बोलताना, नागा चैतन्य अलीकडेच एका कार्यक्रमात म्हणाला होता की, लग्न म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या लोकांसाठी आहे. लग्न हे मोठे थाटामाटात नसावे, उलट लोक संस्कृती आणि परंपरा लक्षात ठेवतात. मला तसे लग्न हवे आहे.