मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात सोशल मीडियावर ऍक्टिव असते. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोचा ट्रेंड खूप छान असतो. तिच्या बोल्ड फोटोजने ती चाहत्यांना इंप्रेस करत असते. या आधी सोफिया बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये दिसली होती. खूप दिवस सोफिया कोणत्याच दुसऱ्या शोध्ये दिसली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. त्याला कारणं देखील काही तशीच आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगपंचमीच्या सणाला तिने आपली एक आठवण शेअर केली आहे. काही आठवणी चांगल्या असतात तर काही वाईट. ही गोष्ट ऐकल्यावर कुणालाही धक्काच बसेल. या घटनेने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 


सोफियाच्या म्हणण्यानुसार एका रंगपंचमी पार्टीत तिच्यासोबत चुकीचा व्यवहार झाला आहे. तिच्या स्कर्टमध्ये कुणीतरी हात घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेने सोफिया पूर्णपणे हादरली होती. एका न्यूज पोर्टला सोफियाने दिलेल्या माहितीनुसार, मी एका होळी पार्टीला गेले होते तेथे अनेक कलाकार होते. मी सगळ्यांसोबत फोटो काढण्यात मग्न होते. 


पार्टीत सगळ्यांना पाणी पुरी दिली जात होती. त्यावेळी त्यामधून भांग देण्यात येत होती. ती पाणीपुरी खाल्याने माझ्यात खूप आनंद निर्माण झाला. यामुळेच मी सगळ्यांसोबत फोटो काढू लागली. त्यावेळी सोफियाच्या माहितीनुसार एक व्यक्ती तिच्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करत होता. सुरूवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं मात्र नंतर पुन्हा असं घडलं तर तिने त्या व्यक्तीला जमिनीवर पाडलं. 


अभिनेत्रीने या घटनेवर नाराजी व्यक्त केलं हे. त्याचवेळी एक मित्र तिच्यासाठी धावून आला. तिला तात्काळ तिच्या घरी सोडण्यात आलं. असं पहिल्यांदाच झालं नाही की, सोफियाने कोणता शॉकिंग किस्सा सांगितला आहे. या अगोदरही सोफियाने अशा घटनेचा उल्लेख केला आहे.