`सलमानच्या परिस्थितीला तू...` ऐश्वर्यावर भडकला सोहेल खान
सलमान आणि ऐश्वरायचे मार्ग आज वेगळे झाले असले तरी, त्यांच्या नात्यांबद्दल अनेकदा चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात.
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. 'हम दिल दे चुके सनम' सिनेमानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर दोघांनी प्रेमाची कबुली देखील दिली. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.
आता दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत. आता दोघे कधीचं त्यांच्या भुतकाळाबद्दल बोलताना दिसत नाहीत. पर पूर्वी दोघे कायम त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचे.
'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना झालेल्या वादांबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'अनेकदा सलमान माझ्यासोबत गैरवर्तवणूक करायचा. पण नशीब त्या जखमा माझ्या शरीरावर राहिल्या नाहीत. '
पुढे ऐश्वर्याम्हणाली, 'सर्व गोष्टी विसरून मी पुन्हा शुटिंगसाठी जायची.. याबद्दल कधी कोणाला सांगितलं नाही, की माझ्यासोबत काय झालं....' ऐश्वर्याच्या या वक्तव्यानतंर सलमानचा भाऊ सोहेल खान तिच्यावर भडकला.
सोहेल म्हणाला, 'आता ऐश्वर्या सर्वांसमोर रडते. जेव्हा सलमानसोबत फिरत होती. कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमच्या घरी येत होती.. तेव्हा कधी तिने नात्याचा स्वीकार केला? कधीचं नाही...'
'यामुळे सलमानला कायम असुरक्षित वाटलं. सलमानला जाणून घ्यायचं होतं, की ती सलमानवर किती प्रेम करते....' आता सलमान आणि ऐश्वर्या वेगळे झाले असले तरी त्यांच्या नात्याच्या चर्चा कायम होत असतात.