मुंबई : एकेकाळची सुंदर अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचा आज ४६ वा वाढदिवस आहे. खूप काळापासून ती लाईमलाईटपासून दूर आहे. १९९३ मध्ये मिस इंडिया झालेल्या या अभिनेत्रीने नंतर मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेतही सहभागी झाली. मात्र तिथे तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.


नम्रताबद्दल काही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नम्रताचा जन्म महाराष्ट्रातील एका ब्राम्हण परिवारात २२ जानेवारी, १९७२ मध्ये झाला. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर नम्रताची मोठी बहिण आहे. इतकंच नाही तर यांची आजी देखील त्याकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होती. 


नम्रताने मॉडलिंगची सुरूवात १९९३ पासून केली. त्यानंतर तिने अभिनयात पर्दापण केले. जब प्यार किसीसे होता हैं मध्ये तिने लहानशी भुमिका साकारली होती. हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर सुपरहिट चित्रपट वास्तवमध्ये ती संजय दत्त सोबत झळकली. मात्र त्याचा काही फायदा नम्रताला करिअरमध्ये झाला नाही.


नम्रताचे काही चित्रपट


पुकार, हेराफेरी, अस्तित्व, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे आणि एलओसी कारगिल यांसारख्या चित्रपटात तिने चांगले काम केले. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपट करायला सुरूवात केली. 



तिची अफेअर्स


वास्तवच्या शुटींगदरम्यान नम्रताचे अफेअर महेश मांजरेकरसोबत सुरू झाले. मात्र ते जास्त काळ टिकले नाही. मात्र त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळात चांगल्याच रंगल्या. २००० मध्ये तेलगु चित्रपट 'वानसी' च्या शूटींग दरम्यान तिची ओळख दक्षिणचा सुपरस्टार महेश बाबू सोबत झाली. महेश बाबू, नम्रतापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. मात्र त्यांच्या नात्यात वय आडवे आले नाही. फेब्रुवारी २००५ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्यांना गौतम आणि सितारा ही दोन मुले आहेत.