मुंवई: अभिनेता सलमान खान त्याची रोमानियन मैत्रीण यूलिया वंतूरसोबत वेळ घालवताना दिसतो आहे. सलमान आणि यूलिया यांची मैत्री जरा जास्तच घट्ट झाली आहे. हे दोघेही नववर्ष साजरं करण्यासाठी गोव्यात गेले होते. नववर्ष साजरा करतानाचे काही व्हिडिओ यूलियाने शेअर केले आहेत. २७ डिसेंबर रोजी यूलियाने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे व्हिडिओ यूलियाने शेअर केले आहेत. या दोघांमध्ये असलेले नाते मैत्रीपेक्षाही जास्त घट्ट असल्याचे दिसते. सलमान यूलिया त्यांच्यात असलेल्या नात्याचा खुलासा करायला मात्र दोघे तयार नाहीत. २०१३ पासून सलमान यूलिया त्यांच्यात मैत्रीचे संबध आहेत. तर सलमान आणि यूलिया त्यांच्यात असलेल्या नात्याबद्दल कधी बोलणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


सलमान खानशी संबंधित एका सूत्राने सांगितल्याप्रमाणे सलमान यूलियाला प्रेमाने 'यू' असे म्हणतो. नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सलमानने यूलियासाठीही मदतीचा हात पुढे केला होता. ती जेव्हा भारतात आली, तेव्हा सलमाने तिची मदत केली होती. तिला काम मिळवून दिले होते. यावरुन हे दोघे किती चांगले मित्र-मैत्रीण आहेत हे स्पष्ट होते.



'द कपिल शर्मा' शोमध्ये मी एकटा नसल्याचे वक्तव्य सलमान खानने केले होते. माझ्या जीवनात कुणीतरी असल्याचे त्याने स्पष्ट केले. रोमानियाची रहिवासी यूलियाचे लग्न झाले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, यूलियाने रोमच्या मारिअस मागोसोबत लग्न केले होते. मारिअस मागो गीतकार, गायक आणि निर्माता आहे.