मुंबई : आजच्या या धकाधकीच्या जीवनात दिवस भरभरा निघून जात आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धा वाढली आहे. आयुष्याच्या या स्पर्धेमध्ये कोणी बाजी मारतं तर कोणाला अपयशाचा सामना करावा लागतो. आयुष्यात मागे वळून पाहिलं तर आठवणींचं गाठोडं क्षणार्धात डोळ्यासमोर उभं राहतं. असंच काहीसं घडलयं बॉलिवूडची दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वात सक्रीय होवून रज्जोला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. २०१० मध्ये तिने 'दबंग' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. तिच्या अभिनयाच्या प्रवासाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्षात ती यशाच्या उच्च शिखरावर वीराजमान झाली आहे. 


आपल्या आठवणींना उजाळा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. ती म्हणते, 'नऊ वर्षांआधी १० सप्टेंबर २०१० मध्ये 'दबंग' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाची सुरूवात केली होती. हा प्रवास खुप आनंद देणारा आणि भावूक करणारा आहे. दिवस कसे गेले माहिती पडलं नाही. असं वाटत आहे की हे सर्व कालचं घडलं आहे.'


सोनाक्षी सध्या तिच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटात ती आणि अभिनेता सलमान खान एकत्र झळकणार आहेत. नुकताच चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.