मुंबई : डोक्यावर उभं राहणं हे सगळ्य़ांना शक्य नाही. हे पाहण्यासाठी जितकं सोपं असतं तेवढं प्रत्यक्षात नसतं. पण अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज ही गोष्ट सहज करतात. हे सेलिब्रिटीज आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी काय काय करतात या वरुन हे लक्षात येतं. सोनाक्षीचा हा व्हिडिओ पाहून सगळेच तिचं कौतूक करत आहे.



काही दिवसांपूर्वी मिस यूनिवर्स सुष्मिताने अॅब्‍स दाखवत सगळ्यांना हैराण केलं होतं. आता सोनाक्षी सिन्‍हाने देखील असं काही केलं आहे. तिचा हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील हैराण व्हाल. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.