Sonakshi Sinha New Home: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोनाक्षी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोनाक्षीनं नुकतंच मुंबईच्या वांद्रे परिसरातील हायराईज बिल्डिंगमध्ये घर घेतले आहे. तिच्या या घराच्या किंमतीनं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. सोनाक्षीनं घेतलेल्या या लक्झरीअस अपार्टमेंटविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाक्षीनं सी-फेसिंग असं एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. तिच्या घराच्या हॉलमधून सी-लिंक पाहायला मिळतोय. तिच्या या घराचा एरिया हा 4 हजार 200 स्क्वायर आहे. वांद्रे वेस्टला असलेल्या वांद्र रिक्लेमेशनच्या रंग शारदा ऑडिटोरियम जवळ 81 ऑरेटे आहे. प्रोजेक्ट प्रमोटर्स पिरामिड डेवलपर्स आणि सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा यांनी 29 ऑगस्ट रोजी रजिस्टर्ड सेल एग्रीमेंटनुसार, सोनाक्षीचं हे घर वांद्रेच्या केसी रोडवर असलेल्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर आहे. 2208.77 मध्ये फक्त अपार्टमेंट आहे. तर सोनाक्षीच्या या अॅग्रीमेंटला Zapkey.com वर शेअर करण्यात आला आहे. तर सोनाक्षीनं 55 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी म्हणून दिले आहेत. तर हे घर 16 व्या मजल्यावर आहे. 



सोनाक्षीच्या या अपार्टमेंटला 348.43 स्क्वेअर फीटचा लॉबी एरिया आहे. त्यासोबत नोकरांसाठी टॉयलेट, एयर हैंडलिंग यूनिटसाठी एक वेगळी जागा आहे. याशिवाय तिच्या या अपार्टमेंटमध्ये 1,653.67 स्क्वेअर फीटचं टेरेस देखील देण्यात आलं आहे. त्यामुळे सोनाक्षीचं हे संपूर्ण अपार्टमेंट एकूण 4,210.87 कार्पेट स्क्वेअर फीट एरियाटं आहे. त्यासोबत सोनाक्षीकडे चार पार्किंगच्या जागा देखील आहेत. सोनाक्षीच्या या घरातून वांद्रे-वरळी सी लिंकचा व्ह्यू दिसत आहे. तर सोनाक्षीच्या या घराची किंमत 11 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. 


हेही वाचा : तुम्हाला लाज वाटत नाही का? मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर संतापलेला सनी देओल


सोनाक्षीनं 30 मे रोजी तिच्या घराचे सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सोनाक्षी तिचं घर सेट करताना दिसत आहे. हॉलमध्ये सगळं फर्निचर दिसत असून त्याला अजून नीट न रचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्याला सेट करणार असल्याचा प्रयत्न करताना सोनाक्षी दिसून येत आहे. तिच्या घरातून दिसणारा सी-व्ह्यूनं अनेकांचे लक्ष वेधले होते. त्यासोबत अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.