महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?

Santosh Deshmukh Murder Case Who Is Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...

| Dec 17, 2024, 12:27 PM IST
1/16

walmikkarad

विधानसभेमध्ये आज बीडमधील सरपंचाच्या हत्येचा मुद्यावरुन थेट वाल्मिक कराड हे नाव घेत विरोधकांनी निशाणा साधला. मात्र राज्याला हादरवणाऱ्या या हत्या प्रकरणामध्ये वारंवार नाव घेतलं जाणारी वाल्मिक कराड ही व्यक्ती आहे तरी कोण?

2/16

walmikkarad

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा विधानसभेमध्येही चर्चेत आल्याचं हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायसला मिळालं. या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. असं असतानाच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे नाव वारंवार समोर येत आहे. 

3/16

walmikkarad

संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. काही आरोपी मोकाट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.   

4/16

walmikkarad

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेत ही व्यक्तीच मुख्य आरोपी असून त्याला अटक करा अशी मागणी केली आहे. 'वाल्मिक कराडचं नाव खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं पण हत्या प्रकरणात नाही,' याकडेही आव्हाडांनी लक्ष वेधलं आहे. 

5/16

walmikkarad

वाल्मिक कराड यांचे अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबरच बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाइलवर दिसतात.

6/16

walmikkarad

मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये बीडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडेही अडचणीत आल्याची चर्चा आहे. कारण ज्या वाल्मिक कराडांचा व त्याच्या नातेवाईकांचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निटवर्तीय आणि खंदे समर्थक आहेत.

7/16

walmikkarad

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. या प्रकरणामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनीही थेट वाल्मिक कराडांचं नाव घेत टीका केल्याने वाल्मिक कराड चांगलेच चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराड आहेत तरी कोण? हे जाणून घेऊयात...

8/16

walmikkarad

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलं. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. तर, येथील पीआय सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे," असं फडणवीसांनी सांगितलं.

9/16

walmikkarad

फडणवीस यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेतलं नसलं तरी आरोपी मंत्र्याच्या जवळचा असल्या आरोपावरुनही भाष्य केलं आहे. "आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे. त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत, आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत म्हटलं आहे.

10/16

walmikkarad

परळी नगर परिषदेचे माजी नरगाध्यक्ष असलेले वाल्मिक कराड हे पूर्वी गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक होते. त्यानंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यापासून दूर गेले.  

11/16

walmikkarad

वाल्मिक कराड हे मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार स्वत: पाहत आहेत.   

12/16

walmikkarad

धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या गैरहजेरीमध्ये परळीत वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतात असं स्थानिक सांगतात.  

13/16

walmikkarad

यापूर्वी देखील वाल्मिक कराड हे कलम 307 सारख्या गुन्ह्यामुळे चर्चेत आले आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नातेवाईकांचा संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

14/16

walmikkarad

बीडमधील राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह अनेकदा वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जाते.   

15/16

walmikkarad

मात्र यंदाचं प्रकरण हे अधिक गंभीर असून थेट विधानसभेत वाल्मिक कराडांच्या नावाचा उल्लेख झाल्याचं दिसून येत आहे.

16/16

walmikkarad

संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज तालुक्यातील विष्णू चाटे हा प्रमुख आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो.