नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरूद्ध फसवणुकीच्याचा आरोप दाखल करण्यात आला होता. आता सोनाक्षीच्या अटकेवर स्थगिती आणण्यात आली आहे. सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त इतर पाच व्यक्तिंवर फसवणुकीचा आरोप करण्यात आले होता. न्यायाधीश नहीद अरा मुनीस आणि विरेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोनाक्षी सिन्हाच्या अटकेवर स्थगिती आणली आहे. न्यायालयाने अटकेवर स्थगिती आणली असली तरीही सोनाक्षीने गून्हाच्या चौकशीच सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांनी ३० डिसेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनाक्षीला आमंत्रीत करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी सोनाक्षीला ३७ लाख रूपये देण्यात आले होते. पण कार्यक्रमाच्या दोन तास आधी तिने कार्यक्रमास उपस्थतीत राहण्यास नकार दिला आणि पैसेही परत न केल्याचा आरोप प्रमोद शर्मा यांनी २२ फेब्रुवारी रोजी सोनाक्षीवर दाखल केला होता. 


प्रमोद शर्मा यांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांना धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. परंतु कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.