मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. सोनालीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सोशल माडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळदीचे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'खूप मजा, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, संगीत..' असं लिहिलं आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या हळदीच्या कार्यक्रमाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.'



हळदीच्या फोटोंनंतर सोनालीने मेहेंदीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मेहेंदीचे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'मेहेंदी लूक सर्वात जास्त खास आहे...' असं लिहिलं आहे. 



महत्त्वाचं म्हणजे सोनालीच्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळत आहेत. सध्या सर्वत्र सोनाली आणि कुणालच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे.