भर कार्यक्रमात दिग्दर्शकाकडून लोकप्रिय अभिनेत्रीला प्रपोझ
अभिनेत्री सिनेमांपासून थोडी दूर
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्र कॅन्सर सारख्या आजारावर मात करून आनंदी आयुष्य जगत आहे. मोठ्या पडद्यावर सोनाली बेंद्रेला बघून अनेकांच्या नजरा खिळायच्या. अनेक अफेअर्सच्या चर्चांना उधाण असताना एक दिवस अचानक गोल्डी बहलने प्रपोझ करून लग्न केलं. सोनाली आपला लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सोनालीने आपल्या फिल्मी करिअरला 1994 साली 'आग' या सिनेमातून सुरूवात केली. या सिनेमात सोनालीसोबत सुपरस्टार गोविंदा हा अभिनेता होता. 1996 मध्ये सोनालीने 'दिलजले' हा सिनेमा केला. यामधला सोनालीचा अभिनय चाहत्यांनी पसंत केली. यानंतर सलमान खानसोबत सोनाली 'हम साथ साथ है' सिनेमात पाहिलं.
सोनालीची गोल्डी बहलसोबत पहिली भेट ही 1994 मध्ये एका सिनेमाच्या सेटवर झाली होती. सोनालीने सर्वात अगोदर गोल्डी बहलच्या प्रपोझलला नकार दिला. मात्र गोल्डी बहलने सोनालीशी संपर्क तोडला नाही. त्यानंतर 1998 मध्ये एका पार्टीत गुडघ्यावर बसून सोनालीला लग्नासाठी प्रपोझ केलं. 4 वर्ष डेट केल्यानंतर गोल्डी बहल आणि सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 रोजी लग्न केलं.
आज सोनाली बेंद्रे आपल्या लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी तिने गोल्डी बहल यांना इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.