मुंबई : बॉलीवुडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टॅटीक कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंजतेयं. आपल्या या आजाराचे निदान ती न्यूयॉर्कमध्ये करत आहे. पण काही वाचाळ लोक कोणतीही शहानिशहा न करत आलेले फॉरवर्ड्स पुढे करत असतात. नुकतेच भाजपा आमदार राम कदम यांनीही ट्वीटरवर सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली दिली. या खोट्या ट्वीटमुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलच धारेवर धरण्यात आलं. सर्वांनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी ते ट्वीट काढून टाकलं.


काय म्हणाला गोल्डी ?



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या सर्वाचा सोनाली आणि तिच्या घरातल्यांवर काय परिणाम होत असेल याचा कोणी विचार केलाय का ? आजारी माणूस घरी असल्यावर त्याच्यासोबत त्याच्या घरच्यांची काय दमछाक होते हे काही नव्याने सांगायला नको. सोनालीचा पती गोल्डी बहलने या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


'मी सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा उपयोग जबाबदारीने करा. अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच पसरवूही नका.विनाकारण आपण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवतो' असे ट्वीट त्याने केले. 


इलाज सुरू 


काही दिवसांपूर्वीच गोल्डी बहलने सोनालीच्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली होती. सोनालीची तब्येत स्थिर असून कोणत्याही त्रासाशिवाय तिचा इलाज सुरू असल्याचे त्याने सांगितले.सोनालीला कॅन्सर झाल्याची ब 4 जुलैला बातमी तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दिली होती.तिचा कॅन्सर लास्ट स्टेजला पोहोचल्याचे तिला तेव्हाच समजले होते.