मुंबई : हायग्रेड कॅन्सरशी सामना करणारी बॉलिवूड अभिनेत्री सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या कठीण काळातही सोनालीने आनंदाने जगणे सोडलेले नाही. त्याचबरोबर आपल्या चाहत्यांसोबतचा कनेक्ट तिला मिस करु द्यायचा नाहीये. त्यामुळेच की काय सोनाली सातत्याने सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असते. फ्रेंडशीप डे नंतर आता पुन्हा एकदा सोनालीने एक स्टोरी इंस्टाग्रावर शेअर केली आहे.\


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत सोनाली न्यूयॉर्कच्या एका बुक स्टोरमध्ये उभी राहून पुस्तक वाचत आहे. तिने केसांना स्कार्फ गुंडाळून त्यावर हॅट घातली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच तिचे केस संपूर्णपणे गेले आहेत. त्याचाही फोटो तिने अगदी खंबीरपणे सोशल मीडियावर शेअर केला होता. 


आता पुस्तक वाचतानाचा नवा फोटो शेअर करत तिने लिहिले की, ''हॅप्पी बुक लव्हर्स डे.'' ९ ऑगस्टला 'बुक लव्हर्स डे' होता. त्यानिमित्ताने हा खास फोटो सोनालीने शेअर केला.



काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गायत्री जोशी आणि ऋतिक रोशनची एक्स वाईफ सुजान खान सोनलीला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला पोहचल्या होत्या. त्यावेळेस फ्रेंडशिप डे निमित्त सोनालीने आपल्या फ्रेंड्ससाठी भावनिक पोस्टही केली होती.