अमेरिका : कॅन्सर या आजाराचे नाव ऐकलं तरीही अनेकांचा थरकाप उडतो. कॅन्सर हा त्रास जितका वेदनादायी आहे तितकेच त्याचे उपचारही त्रासदायक असतात. मात्र सकारात्मक दृष्टीकोनाने तुम्ही अवघड परिस्थितीमधूनही मार्ग काढू शकता. सध्या कॅन्सरशी सामना करणार्‍या सोनाली बेंद्रेचाही असाच सकारात्मक दृष्टीकोन तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  


सोनली बेंद्रेचा नवा लूक - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली ब्रेंद्रे सध्या हाय ग्रेड कॅन्सरची सामना करत आहे. हा कॅन्सर Metastatic Cancer आहे. मात्र या कॅन्सरवर निर्धाराने मात करणार असल्याचा आत्मविश्वास सोनालीने व्यक्त केला आहे. या आजाराचा सामाना करताना सोनालीने तिच्या लूकमध्ये बदल केला आहे. सोनालीच्या नव्या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. 




सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट  


 



सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर या आजाराशी सामना करण्यासाठी जभरातून मिळणार्‍या प्रेम, प्रार्थना यांचा स्वीकार करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


सोनाली बेंद्रेने शेअर केलेल्या पोस्टनुसार,  Isabel Allende या तिच्या आवडत्या ल्रेखिकेचे काही विचार शेअर केले आहेत. त्यानुसार, जो पर्यंत जीवनात कठीण परिस्थिती येत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःमधील दडलेल्या अनेक बलस्थानांची माहिती नसते. चाहत्यांकडून मिळणार्‍या प्रेमामुळेच मी एकटी पडलेली नाही याची जाणीव झाली आहे. तुमच्या प्रेमामुळे मी अधिक मजबूत झाली आहे. यामुळे निर्धाराने कॅन्सरचा समाना करण्यास मी सज्ज झाली आहे. असा विश्वास सोनालीने सोशल मीडियामध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. 


न्यूयॉर्कमध्ये उपचार 


कॅन्सरचा सामना करण्यासाठी सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आहे. कॅन्सरची माहिती मिळताच सोनालीचे चाहते आणि बॉलिवूडमधील तिच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. अक्षय कुमारने सोनालीची अमेरिकेमध्ये भेटही घेतली आहे.  'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!