मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. दुर्धर कॅन्सरची सकारात्मकतेने लढा देताना सोनाली तिच्या आरोग्याबददलच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अमेरिकेत उपचारादरम्यान मैत्रिणींसोबत यंदा फ्रेड्शिप डे साजरा करताना तिने एक फोटो आणि खास पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली बेंद्रेचा कॅन्सर Metastatic Cancer आहे. हाय ग्रेड कॅन्सरअसणार्‍या कॅन्सरची सामना करत असल्याचं सोनालीने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलं होतं. अचानक आलेल्या या बातमीने बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला असला तरीही सारेच सोनालीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहे. 


सोनालीची नवी पोस्ट 



कॅन्सरचे उपचार वेदनादायी आहेत. कधी मला खूपच लो वाटतं पण अशावेळीही माझ्या अवतीभोवती मित्रमंडळी आहेत. माझी सध्याची स्थिती पाहून अनेकजण मला 'लूक' देतात, पण मी आनंदी आहे. मी अनेक लहान लहान गोष्टींमध्ये आनंद अनुभवण्याचं सुख मिळवत आहे. माझ्या अशा काळात आधारस्तंभासारख्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सार्‍या मित्र मंडळींचे आभार ! कॅन्सरच्या उपचारा दरम्यान सोनालीचे सारे केस गळाले आहेत. आता मला तयार व्हायला फार वेळ लागत नाही . #BaldIsBeautiful  म्हणत, प्रत्येक गोष्टीत सकारत्मकता शोधा असंं सांगत तिने हा फोटो शेअर केला आहे. सोनालीचा हा फोटो अभिनेता ऋतिक रोशनने क्लिक केला आहे. ऋतिकप्रमाणेच काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनेही सोनालीची अमेरिकेत भेट घेतली होती.