मुंबई : अप्सरा आली.... म्हणतं सगळ्या प्रेक्षकांना आपल्या नृत्यातील दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी बाणा जपत सोनालीने आपल्या नृत्य करिअरमध्ये महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली कुलकर्णी झी मराठीवरील 'डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज'चा ग्रँड फिनाले लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सेटवर सोनालीने एक महत्वाचा निर्णय घेतला. सोनाली कुलकर्णी शक्यतो मराठी कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाही. हे सोनालीला खूप मनापासून वाटत आहे. आणि ती ही गोष्ट फॉलो करत आहे. सोनालीने नुकत्याच पार पाडलेल्या डान्सिंग क्वीन कार्यक्रमात आपल्या मराठी गाण्यांवर नव्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे. 




सोनाली कुलकर्णी नुकतीच लंडनहून परतली आहे. आपल्या आगामी सिनेमाच्या शुटिंगकरता ती लंडनमध्ये गेली होती. या सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे करणार असून अमेय खोपकर, स्वाती खोपकर निर्माते आहेत. सोनाली लंडनहून परतल्यानंतर डान्सिंग क्वीनच्या सेटवर दिसणार आहे. 



सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनय, नृत्यासोबत पॉडकास्ट द्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहे. सोनालीच्या पॉडकास्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे.