मुंबई : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. निधन झालं तेव्हा त्या गोव्यात होत्या. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. एकीकडे पोलीस त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे सोनाली यांचं निधन झालं नसून हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंब व्यक्त करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूनंतर सोनाली यांच्या चेहऱ्यावर व्रण आणि सूज असल्याचा दावा सोनाली फोगटच्या पुतण्याने केला आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाली फोगट यांचा पुतण्या मोहिंदर फोगट यांनी खळबळजनक दावा केला आहे. 


'सोनाली कधीच ड्रग्ज घेत नव्हत्या. त्यांनी ड्रग्स घेतलं असं सांगण्यात येत आहे, पण त्यांना काहीतरी मिसळून ड्रग्स दिलं असावं.. त्यांची प्रकृती स्थिर होती. अचानक सोनाली यांनी हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो' अशा प्रश्न मोहिंदर फोगट यांनी उपस्थितीत केला आहे. 


जर त्यांनी खरंच ड्रग्ज घेतली असेल तर कोणीतरी त्यामध्ये काहीतरी मिसळून दिली असावी. एवढेच नाही तर ती बऱ्यापैकी निरोगी आहे, त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका येऊ शकला नाही, असे मोहिंदरने सांगितले.


सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आज गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सोनाली यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.


एवढंच नाही तर, सोनाली फोगट यांच्या शवविच्छेदनाची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड केरण्यात येणार आहे. या प्रकरणी सर्व तपास गोव्यात होणार आहे.