मुंबई : सोनम कूपर आहूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आनंद आहूजासोबतचे फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती फ्लाइटमध्ये दिसतेय. ते दोघे कुठे चालले आहेत याचा अंदाज फोटो पाहून येत नाही. पण २ दिवसांनंतर ती कान्समध्ये वॉक करणार आहे. या फोटोंमध्ये सोनमने गॉगल घातलाय तसेच तिची मेहंदीही दिसतेय. या फोटोंसहित तिने एक व्हिडिओही शेयर केलाय.. जिथे ती झोपेत आहे. सोनम आणि तिची बहिण कान्सच्या तयारीचे व्हिडिओ, फोटो सतत शेयर करत असतात. तिच्या कान्स लुकची सर्व चाहते वाट पाहत आहेत.



रॉमॅंटीक फोटो 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारीच आनंद आणि सोनमचा एक रोमॅंटीक फोटो व्हायरल झाला होता.



ज्यामध्ये सोनम साडीमध्ये तर आनंद सूटमध्ये दिसतोय.



सोनमने ८ मेला आनंद आहुजाशी लग्न केल. त्यानंतर संध्याकाळी तिने रिसेप्शन पार्टीही दिली. यावेळी अनेक बॉलीवुड सेलिब्रेटी पोहोचले होते.