मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंज अहूजाने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आणि कुटुंबाला आनंदाची बातमी दिली. पण आता अहूजा कुटुंब मोठ्या अडचणीत आलं आहे. सोनम आणि आनंद यांच्या दिल्लीमधील घरात घुसून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये रोकड आणि दागिन्यांचा देखील समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, अहूजा यांच्या दिल्लीतील घरातून जवळपास 1 कोटी 41 लाख रुपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे अहूजा कुटुंब मोठ्या संकटात आहेत. 


आनंद आहुजाची आजी सरला आहुजा यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली . याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 


सोनम कपूरच्या सासरी जवळपास 35 नोकर काम करतात. आता पोलीस या सर्वांची चौकशी करू शकतात. घरातील 35 जणांवर पोलिसांचा  संशय आहे. रिपोर्टनुसार, ही घटना फेब्रुवारीमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरात घडली होती.


सोनम कपूरची 86 वर्षीय आजी सासू सरला आहुजा, सासरे हरीश आहुजा आणि प्रिया आहुजा दिल्लीत राहतात.  सरला आहुजाचे मॅनेजर रितेश गौरा यांनी 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


त्यांच्या घरातील कपाटामधून 1 कोटी 40 रुपयांचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी त्याच्या घरातील 25 नोकर, 9 केअरटेकर, ड्रायव्हर आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या इतर लोकांची पोलीस चौकशी करू शकतात.