सोनम कपूरकडे नीरव मोदीच्या घराची मालकी, 40188499171.80 इतक्या रुपयांना खरेदी केलं घर
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी मुंबईचे प्रसिद्ध रिदम हाऊस विकत घेतले आहे. ज्यासाठी त्यांनी मोजलेली रक्कम अक्षरशः घाम आणणारी आहे. हे स्टोअर 2018 मध्ये बंद झाले होते त्याआधी ते नीरव मोदीने खरेदी केलं होतं.
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी खूप महागडी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. असे सांगितले जात आहे की, या जोडप्याने मुंबईतील एक म्युझिक स्टोअर आपले नावे केल्याच सांगण्यात येत आहे. ज्यासाठी त्यांनी 478.4 दशलक्ष रुपये मोजणार आहेत. जर आपण ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये सांगितली तर ती रक्कम होतेय 40,18,84,99,171.80 (4 हजार 18 कोटी रुपये) होईल. या स्टोअरचे नाव 'रिदम हाऊस' आहे. जे 2018 मध्ये बंद झाले होते. हे फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक नीरव मोदी चालवत होते. मात्र, अब्जावधी डॉलर्सच्या बँकेच्या कर्जामुळे हे घर विकावं लागलं आहे.
"ब्लूमबर्ग न्यूज' या स्टोरची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने फोनवर दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे. सोनम कपूर आणि आनंद अहुजा Bhaane Group चे मालक आहेत. यांच्या प्रवक्ताने सांगितलं की, कपलने रिदम स्टोअर खरेदी केली आहे.
मुंबईतील लोकप्रिय घर
रिदम हाऊस हे मुंबईतील कोला घोडा परिसरात असून ते 3600 वर्ग फूट परिसरात पसरलेले आहे. रिपोर्ट्सनुसार, हे स्टोअर बंद होण्यापूर्वी खूप प्रसिद्ध होते. येथे केवळ महान संगीतकारच येत नसत. त्याबरोबर बॉलिवूड कलाकार देखील येथे उपस्थित राहायचे. 1990 च्या दशकात म्युझिक पायरसी आणि डिजिटल स्ट्रीमिंगच्या आगमनामुळे ते व्यवसायाबाहेर गेले.
नीरव मोदीने खरेदी केलं होतं घर
नीरव मोदीने 2017 मध्ये करमाळी कुटुंबाकडून रिदम हाऊस खरेदी केले होते. मात्र त्यानंतर त्याचे दरवाजे कायमचे बंद झाले. आता 2024 मध्ये, आनंद आहुजाचे वडील हरीश आहुजाच्या शाही एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत फॅशन लेबल विकत घेतले आहे. खरेदीचे सर्व काम पूर्ण झाल्याचे प्रवक्त्याने सांगितले आहे. भाने ग्रुप आधीच रिटेल क्षेत्रात सक्रिय आहे आणि भारतात Converse आणि Nike स्टोअर्स चालवतो.