मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिची पहिली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. दरम्यान, ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी लंडनहून भारतात परतली आहे. अशा परिस्थितीत सोनम कपूरला मुंबई एअरपोर्टवर रात्री उशिरा पापाराझींनी स्पॉट केलं. यादरम्यान सोनम कपूरची एक झलक पाहण्यासाठी आणि तिला कॅमेऱ्यात कैद करण्यााठी खूप लोकं जमले होते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिवळ्या ड्रेसमध्ये दाखवला बेबी बंप 
यावेळी सोनम कपूर पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली. समोर आलेले सगळे फोटो आणि व्हिडिओंमध्ये, आपण पाहू शकता की, यावेळी सोनम कपूर तिच्या मॅटर्निटी ड्रेसमध्ये बेबी बंप हाताळताना दिसत होती. यादरम्यान अभिनेत्रीने तिचा मोठा बेबी बंप अतिशय सुंदर पद्धतीने फ्लॉंट केला. यादरम्यान प्रेग्नंट सोनम कपूर स्वत: आणि मुलाच्या आरोग्याबाबत गंभीर दिसत होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी अभिनेत्रीने तिचा चेहरा मास्कने झाकला होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोनम कपूरचा ग्रँड बेबी शॉवर लंडनमध्ये पार पडला. सोनम कपूरने चाहत्यांसोबत बेबी शॉवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यासोबतच, भारतात आल्यानंतर सोनमच्या बेबी शॉवर सोहळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोनम कपूर तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि अभिनेत्रीची प्रसूतीची तारीखही जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वजण सोनम कपूरच्या बेबी शॉवरच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत.