श्रीदेवी यांच्या निधनाने या अभिनेत्रीने पुढे ढकलला तिचा विवाह
श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबातील सर्वच जण या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई : श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबातील सर्वच जण या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.
श्रीदेवी यांचं जाणं अजूनही अनेकांना खरं वाटत नाही आहे. त्यातच आता अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील आपला विवाह पुढे ढकलला आहे. २८ फेब्रुवारीला सोनम कपूर जेव्हा श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी स्पोर्ट्स क्लबला पोहोचली तेव्हा श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींचं तिने सांत्वन केलं. त्यावेळी तिच्या सोबत तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा देखील उपस्थित होता. काकूच्या जाण्याने सोनमला देखील मोठा धक्का बसला आहे.
सोनम कपूरचा विवाह याच वर्षी होणार होता. पण कपूर कुटुंबियांनी हा विवाहा सोहळा आता पुढे ढकलला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहूजा यांच्या विवाहाची तयारी देखील झाली होती. अनिल कपूर यांच्या घरी ही तयारी सुरु होती. दुबईमध्ये झालेल्या मोहित मारवाह याच्या विवाहानंतर सोनम आणि आनंदच्या लग्नाचा विचार होता. पण आता हा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे. सोनम आणि वडील अनिल कपूर यांच्यासाठी सध्या प्राधान्य श्रीदेवींची मुली आणि बोनी कपूर यांच्यासाठी आहे.