नॉर्मल की सी-सेक्शन... कशी झाली Sonam Kapoor ची डिलिव्हरी, अभिनेत्रीनं का केला हा खुलासा?
अभिनेत्री सोनम कपूरने देखील तीन महिन्यांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम आणि पती आनंद अहुजा यांनी मुलाचं नाव वायू ठेवलं आहे.
Sonam Kapoor Delivery Tips: गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी जोडप्यांच्या आयुष्यात खास पाहुण्यांची एन्ट्री झाली. अभिनेत्री सोनम कपूरने (sonam kapoor) देखील तीन महिन्यांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. सोनम आणि पती आनंद अहुजा यांनी मुलाचं नाव वायू ठेवलं आहे. सोनम कायम चिमुकल्यासोबत फोटो शेअर असते. पण सोनमने मुलाचा चेहरा चाहत्यांना (sonam kapoor baby pictures) दाखवलेला नाही. पण आता अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान आलेले अनुभव शेअर केले आहेत. (sonam kapoor baby)
सोनम कपूरने डिलिव्हरीबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोनम कपूरची डिलिव्हिडी सी-सेक्शन पद्धतीने झाली, नसून नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य देवून पहिल्या मुलाला अभिनेत्रीने जन्म दिला आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे सोनमला स्तनपान करणं देखील सोपं झालं असल्याचं अभिनेत्री म्हणाली..
आयुर्वेदिक पद्धतींचा उपयोग
प्रसूती नैसर्गिक पद्धतीने व्हावी आणि वैद्यकीय हस्तक्षेप कमी असावा... असं सोनमने सुरुवातीलाच ठरवलं होतं. यासाठी अभिनेत्रीने अनेक पुस्तकं वाचली आणि नैसर्गिक गोष्टींची मदत घेतली. आयुर्वेदिक गोष्टींची मदत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली. म्हणून मला मुलाला सहज स्तनपान करता येत आहे... असं देखील अभिनेत्री म्हणाली. (sonam kapoor instagram)
प्रेग्नेंसी दरम्यान स्ट्रेचमार्क येवू नये म्हणून देखील आभिनेत्री मेहनत घेतली. प्रेग्नेंसी दरम्यान सोनमने तिच्या आहारात प्रथिने आणि कोलेजनचा समावेश केला. एवढंच नाही तर, प्रेग्नेंट असताना सोनमला दातांचा त्रास जाणवू लागला. (sonam kapoor father)
होणाऱ्या दातांच्या त्रासावर अभिनेत्री म्हणाली, 'यासाठी मला डॉक्टरांची (sonam kapoor mother) मदत घ्यावी लागली. दातांचा त्रास कमी करण्यासाठी तिने ऑइल पुलिंग देखील केलं होतं.' असं देखील सोनम कपूरने महिलांना सांगितलं.
प्रेग्नेंसीमध्ये आहार असा अवासा....
शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सोनमने खरबूज, आंबा, बटाटा, केळी, संत्री, द्राक्षांचा रोजच्या आहारात समावेश केला. या शिवाय बीन्स, मसूर, मटार, नट्स, सीड्स, चिकन यासोबतच गरोदरपणात जास्त पाणी पिणंही खूप गरजेचं असल्याचं सोनमने सांगितलं.