कंगनावर भडकली सोनम कपूर, ट्विटकरून सुनावलं
कंगनाची तुलना करण्यासाठी सोनमने `हा` शब्द वापरला
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रानौत आपल्या ट्विटमुळे कायम चर्चेत राहिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने अनेक दिग्जांवर नेपोटिझमचे आरोप केले आहेत. तसेच बॉलिवूडचा ड्रग्ससोबत असलेल्या संबंधावर देखील कंगना बोलली.
कंगना गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या दुसऱ्या बाजूबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलत आहे. गुरूवारी तिने केलेल्या स्टेटमेंटमुळे बॉलिवूड कलाकार भडकले आहे. या ट्विटवरून बॉलिवूड, मराठी कलाकारांनी कंगनावर टीका केली आहे. एवढंच नव्हे तर तिच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
कंगनाने शिवसेनेच्या संजय राऊतांवर टीका केली. मुंबईत मला पीओकेमध्ये असल्यासारखं वाटतं. या कंगनाच्या वक्तव्यावरून खूप चर्चा झाली. अगदी रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे या बॉलिवूड कलाकारांनी मुंबई मेरी जान म्हणत कंगनाला प्रत्युत्तर दिलं.
सोनम कपूरने एक ट्विट केलं. यामध्ये सोनम कपूरने नाव न घेता कंगनावर टीका केली आहे. 'मी खूप अगोदर वाचलं होतं. डुक्करासोबत भांडू नये. यामुळे आपल्याच अंगावर चिख्खल उठते. आणि डुक्कराला मजा येते.'