मुंबई : सोशल मीडियावर सध्या पझल्स जोरदार सुरू आहेत. पझल्स सोडवण हा प्रत्येकाचाच एक विरंगुळा ठरला आहे. असाच विरंगुळा अभिनेत्री सोनम कपूरला महागात पडलं आहे. या पझल्समुळे चक्क सोनम कपूर ट्रोल झाली आहे. फिल्मफेअर मॅगझीनचे एडिटर जितेश पिल्लईने एक ट्विट करून पझल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विचारलं होतं की या फोटोत किती त्रिकोण आहेत. ज्याच उत्तर देताना अभिनेत्री सोनम कपूर फसली आहे. आणि चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तिने त्यावेळी दिलेले उत्तर योग्य वाटत होतं पण चाहत्यांनी तिला खरं उत्तर देऊन सोनमला तू चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतर सोनमला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम कपूरने पिल्लर्इंच्या या प्रश्नाला लगेच  ‘सात’ असे उत्तर दिले आणि याच उत्तराने तिचे हसे झाले. सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. लवकरच सोनमला आपली चूक उमगली. तिने परतून एकट्वीट  केले. ‘मी घाईघाईत ट्वीट केले. मी चूक आहे, मला माहित होते. पण अद्यापही मला याचे उत्तर ठाऊक नाही,’ असे तिने लिहिले. तिच्या उत्तरावर एका युजरने तिची आणखी फिरकी घेतली.तसेच काहींनी तर सोनम कपूरची चक्क आलिया भट्टसोबत तुलना केली आहे. 



सध्या सगळ्यांचे लक्ष सोनम कपूरच्या लग्नाकडे लागले आहे. बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबत सोनम लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आहेत.  येत्या ९ ते १२ मेदरम्यान  स्वित्झर्लंडच्या मॉन्ट्रो शहरात सोनम व आनंद लग्न करणार, अशी खबर आहे.