मुंबई : बॉलिवूडची मसकली गर्ल सोनम कपूर आता मिसेस अहुजा झाली आहे. आज शीख पद्धतीमध्ये सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा विवाह झाला आहे. आज लग्नानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आले आहे.  


 मुंबईत पार पडला लग्नसोहळा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आज मुंबईत आनंद अहुजा आणि सोनम कपूरचा विवाह पार पडला. सोनमच्या मेहंदी सेरेमनीपासून अनेक सोहळ्याचे फोटो, व्हिडिओज सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आले आहे. 


 'बाबू' म्हटल्यावर सोनमला पडला ओरडा 


 आज लग्नसोहळ्यात वरमाला गळ्यात घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये सोनम आनंदच्या गळ्यात हार घालताना तिच्या हातातील कलीरा आनंदच्या शेरवानीमध्ये अडकला. त्यावेळेस सोनमच्या तोंडून 'सॉरी बाबू' असे बाहेर पडलं. तिने कलीरा सोडवण्यासाठी आईकडे मदत मागितली. मात्र त्यापूर्वीच सोनमला 'बाबू' म्हणण्यावरून ओरडा पडला. आता 'बाबू' नाही तर 'आप' म्हणं.. असा दम जवळच्या एका व्यक्तीने भरला.  त्यानंतर सोनम कपूरनेही लगेच आनंदला 'आप' असे संबोधले.   


 



 सोनम - आनंद अडकले लग्नबंधनात  


 सोनम कपूर आणि आनंद अहुजा लग्नबंधनात अडकले. आनंद हा दिल्लीस्थित उद्योगपती आहे. गेली काही वर्ष सोनम आणि आनंद रिलेशनशीपमध्ये होते.