मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकली. सोनम आपल्या लग्नाबद्दल अत्यंत उत्सुक होती. तिच्या परिवारानेही हा विवाहसोहळा देखणा आणि स्पेशल बनवण्याची संधी सोडली नाही. सोनम कपूरचे लाल लेहेंग्यातील फोटोज समोर आले आहेत. तर आनंदने बेज रंगाची शेरवानी परिधान केली आहे. आता समोर एक खास व्हिडिओ आला आहे. ज्यात सोनम कपूर आपल्या भावांसोबत लग्नमंडपात दाखल झाली. यात पुढे अर्जुन कपूर आणि हर्षवर्धन कपूर दिसत आहेत. आणि सोनम नाजूक पाऊल उचलत लग्नमंडपात दाखल होत आहे.



सोनमने लग्नात डिजाईनर अनुराधा वाकिल यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. तर मेंहदी कार्यक्रमालाही अनुराधाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. सोनमच्या प्रत्येक सोहळ्यासाठी एक खास थीम ठेवण्यात आली होती. ट्रेडिशनल थीम असलेल्या लग्नसोहळ्यात सर्व मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रेटींज ट्रेडिशनल पोशाखात दिसले.