Sonam Kapoor and King Charles III : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फॅशन आणि तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोनम बऱ्याचवेळा काही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते. आता पुन्हा एकदा सोनम चर्चेत आली आहे. यावेळी सोनम चर्चेत येण्याचं तिची फॅशन किंवा मग चित्रपट नाही तर किंग चार्ल्स थर्ड हे आहेत. आता तुम्हाला प्रश्न असेल की सोनम चर्चेत असण्यासाठी किंग चार्ल्स थर्ड कसे काय कारणीभूत आहेत. तर 7 मे रोजी किंग चार्ल्स थर्ड यांची क्राउन सेरेमनी आहे. त्या कार्यक्रमात सोनम हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात फक्त सोनम नाही तर हॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील हजेरी लावणार आहे. हॉलिवूड कलाकारांविषयी बोलायचं झाले तर त्यात अभिनेता टॉम क्रूद आणि गायिका कॅटी पेरी देखील आहे. तर भारतातून हा मान फक्त सोनम कपूरला मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग चार्ल्स थर्ड यांच्या क्राउन सेरेमनी कार्यक्रमात सोनम, टॉम क्रुझ, कॅटी पेरी आणि लियोनेल रिची यांनी हजेरी लावली होती. तिला या महिन्याच्या सुरुवातीलाच कार्यक्रमात पाहुणी म्हणून हजेरी लावण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमाची निर्मिती बीबीसी स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. तर डाउनटन अॅबे आणि पॅडिंग्टन स्टार ह्यू बोनविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतील. त्यांनी दिलेल्या एका प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की बकिंगहॅम पॅलेसला ही माहिती देताना आनंद होत आहे की हा कार्यक्रम शनिवारी 6 मे ते सोमवार 8 मे 2023 पर्यंत असणार आहे. सर्विस कॅन्टरबरीच्या आर्चबिशपद्वारे हा कार्यक्रम पार पडणार आहे.  



दरम्यान, या आधी सोनम आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली होती आणि ते म्हणजे Apple चे सीईओ टिम कुकसोबत ती दिसली होती. सोनम आणि टिम कुकु हे मुंबईत आयपीएलची मॅच पाहायला पोहोचले होते. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तर सोनमनं देखील त्याचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यासोबत हे फोटो शेअर करत सोनमनं भारतात येण्यासाठी टिम कुक यांचे आभारही मानले होते. पुढे त्यांना इथे येऊन खूप चांगलं वाटलं असेल अशी आशा तिनं व्यक्त केली आहे.  तिनं शेअर केलेल्या फोंटोमध्ये सोनमसोबत तिचा पती आनंद अहुजा असे आहे. 


हेही वाचा : 'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?


सोनम कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, सध्या ती सध्या कामाला प्राधान्य देत नसून मुलगा वायुसोबत वेळ व्यथित करत आहे. वायुचा जन्म हा 20 ऑगस्ट रोजी मुंबईत  झाला. तर सोनमचं लंडनला घर असून ती पती आनंद आहुजासोबत तिथेच राहते. सोनम आणि आनंद 2018 साली लग्न बंधनात अडकले होते.