सोनमच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदाच आपल्या बहिणींसोबत दिसला अर्जून कपूर...
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिजनेसमॅन आनंद आहुजा मंगळवारी विवाहबद्ध झाले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिजनेसमॅन आनंद आहुजा मंगळवारी विवाहबद्ध झाले. याप्रसंगी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. अनिल कपूर, संजय कपूर, बोनी कपूर नेहमीप्रमाणे एकत्र होते.
तर अर्जून कपूर बहिण अंशुला आणि सावत्र बहिणी जान्हवी-खुशीसोबत दिसला. त्यांनी एकत्र फोटोजही काढले.
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बोनी कपूरच्या मुलांमध्ये असलेला दूरावा संपल्याचे दिसून येते. आता ही चार मुले अनेकदा एकत्र दिसतात.
अंशुला आणि जान्हवीने लाईट ब्लू रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यात त्या दोघीही खुलून दिसत होत्या. तर खुशीने पिंक गोल्डन रंगाचा ड्रेस घातला होता.
सोनम कपूरच्या रिसेप्शनला बोनी कपूरची चारही मुले एकत्र दिसली.
सोनम कपूरच्या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, करण जोहर, कंगना रानौत, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली.