मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिजनेसमॅन आनंद आहुजा यांचा बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच पार पडला. सोनमच्या रिसेप्‍शनला बॉलिवूडकरांची अपार गर्दी लोटली. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचा किंग खान आणि दबंग खान एकत्र दिसले. आपल्या धमाकेदार अंदाजाने सलमान शाहरुखने खूप मज्जा आणली. सोनम कपूरची आई सुनीता कपूर हिला पाहताच दोघांनी त्यांच्य जून्या सिनेमातील करण अर्जूनचा अवतार घेतला आणि गाणे गायला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिसेप्शनमधील एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख सलमान करण अर्जून सिनेमातील ये बंधन तो प्यार का बंधन है हे गाणे गात आहेत. त्यावेळी अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर यांना पाहुन, त्यांचा पदर पकडून दोघे गाणे गात आहेत. त्यावेळेस सुनीता कपूर बोलत आहेत की, कोणीतरी यांना थांबवा, मला करण अर्जूनपासून वाचवा. त्यावेळेस तिथे उपस्थित अनिल कपूर जोरजोरात हसू लागतो. पहा हा धमाकेदार व्हिडिओ...



मंगळवारी मुंबईतील द लीला हॉटेलमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन झाले. त्याच दिवशी सकाळी दोघांचा पंजाबी पद्धतीने विवाह झाला.